आगामी काळात योजना आखण्याच्या तयारीत
वृत्तसंस्था/ वी दिल्ली
युनियन बँक ऑफ इंडियाकडून लवकरच इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्समधील हिस्सेदारी जवळपास 10 टक्क्मयांनी कमी करण्याची शक्मयता आहे. अशी माहिती एका उच्च अधिकाऱयांनी दिली आहे. सरकारकडून बँकांचे मोठय़ा प्रमाणात विलगीकरण करण्यात आल्याच्या कारणामुळे युनियन बँक ऑफ इंडियाला इंडियाफर्स्ट इन्शुरन्समधील फक्त 30 टक्के हिस्सा प्राप्ती झाली आहे. युनियन बँकेला हा हिस्सा आंध्र बँकेत विलगीकरण झाल्यानंतर मिळाला आहे.
सदरचे विलगीकरण 1 एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे. भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण(इरडा) यांच्या दिशानिर्देशानुसार एक विमाधारक दोन विमा उपक्रमांसोबत एकाच वेळी 10 टक्क्मयांपेक्षा अधिकची हिस्सेदारी ठेऊ शकत नाही.
युनियन बँकेचे पास स्टार युनियन दाई-इची लाईफ इन्शुरन्समध्ये 25.10 टक्के हिस्सेदारी आहे. या संयुक्त उपक्रमांसोत अन्य ठिकाणीही बँकेचा वाटा असून यात बँक ऑफ इंडिया आणि जपानची दाई-इची लाईफ होल्हिंगचाही समावेश आहे. यावेळी पीटीआयशी बोलताना युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजकिरण रॉय यांनी म्हटले, की आम्ही अगोदरच्या आंध्र बँकेतील हिस्सेदारी 10 टक्क्मयांच्या खाली नेण्याची सुरुवात करण्याची करण्याची प्रक्रिया करत असल्याचे यावेळी स्पष्टीकरण दिले आहे.
हिस्सेदारी विकण्याची प्रक्रिया
आंध्र बँकेनी हिस्सेदारी विकण्याची प्रक्रिया मागील वर्षात सुरु केली होती. संयुक्त उपक्रमांनी बँक ऑफ बडोदाची 44 टक्के हिस्सेदारी होती. तर यातील मुख्या 26 टक्के हिस्सेदारी वारबर्ग पिंक्सच्या हक्काची कार्मेल पाँईट इन्वेस्टमेंटच्या जवळ आहे. त्यांनी म्हटले आहे, की दोन्ही विमा उपक्रम चांगले सुरु आहेत. यातून मूल्यांकनात आणखीन सुधारणा होत असल्याचे स्पष्टीकरण यावेळी बँकेनी दिले आहे.