नवी दिल्ली
सिमेंट क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी इंडिया सिमेंटस् कंपनी येत्या काळामध्ये मध्यप्रदेशमध्ये आपला सिमेंटचा कारखाना सुरू करणार असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीनिवासन यांनी दिली आहे. 75 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये श्रीनिवासन यांनी ही माहिती दिली असून कंपनीने येत्या काळामध्ये 551 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनिवास हे पाच वर्षांसाठी सदरच्या पदावर कायम राहणार आहेत, अशीही माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. कंपनीच्या अंतर्गत खर्चामध्ये कपात होत असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.