ऑनलाईन टीम / जकार्ता :
इंडोनेशियाच्या जकार्तामधील सुकिर्णो हत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन शनिवारी दुपारी उड्डाण केलेले श्रीविजया एअर फ्लाईट 182 हे विमान काही क्षणात रडारवरून गायब झाले आहे. इंडोनेशियाच्या वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
रडारवरून गायब झालेले हे प्रवाशी विमान बोईंग 737-500 या प्रकारातील होते. दुपारी 2.40 वाजता या विमानाचा शेवटचा संपर्क झाला होता. विमानात किती लोक होते, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही.