ऑनलाईन टीम / जकर्ता :
इंडोनेशियाच्या पश्चिमी मध्य प्रांतातील जावा येथे आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. 6.1 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती.
या भूकंपाचे केंद्रबिंदू जावा प्रांतातील जेपारा जिल्ह्यापासून 578 किमीवर होते. इंडोनेशियाच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 5 वाजून 54 मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाने संपूर्ण परिसर हादरला. सुदैवाने यात कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. इंडोनेशिया आपात्कालीन विभागाचे सचिव एप्रिलिया एलिसियावती यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, सोमवारी रात्री नऊच्या सुमारास इंडोनेशियात 4.0 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान विभागाने दिली.