ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. फक्त बॉलिवूड नाही तर सगळेच सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली देत आहेत. अशातच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी इंदूरमध्ये स्व. लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमी स्थापन केली जाईल. एक संग्रहालयही बांधले जाईल, ज्यामध्ये लताजींनी जे काही गायले आहे ते उपलब्ध असेल. इंदूरमध्येच त्यांचा पुतळा बसवला जाईल आणि दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी लता मंगेशकर पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे. इंदूरमध्ये स्व. लता मंगेशकर यांचा पुतळा बसविण्यात येईल. दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी स्व. लता मंगेशकर पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.