ऑनलाईन टीम / भोपळ :
इंदोरमध्ये मागील चोवीस तासात 61 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे इंदूरमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2299 वर पोहचली आहे, अशी माहिती मुख्य चिकित्सा आणि स्वास्थ्य अधिकारी प्रवीण जडिया यांनी शुक्रवारी दिली.
ते म्हणाले, कोविड -19 ची लागण झालेल्या 75 वर्षीय आणि 55 वर्षीय अशा दोन पुरुषांचा उपचारा दरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे आता पर्यंत 98 जणांनी आपला जीव गमावला आहे. शुक्रवार सकाळ पर्यंत कोरोना रुग्णांचा मृत्यू दर 4.26 टक्के नोंदविण्यात आला आहे.
इंदोरमध्ये कोरोनाचा पाहिला रुग्ण 24 मार्च रोजी सापडला होता. त्यानंतर 25 मार्च पासून संपूर्ण जिल्ह्यात कर्फ्यू लावला असून जिल्ह्यातील अन्य क्षेत्रात देखील कडक लॉक डाऊन सुरू आहे.
दरम्यान, सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या 81 हजार 970 झाली असून आता पर्यंत 2 हजार 649 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 27 हजार पेक्षा अधिक रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.