वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळी आणि परराज्यांतील इंदोर बटाटा 200 रु. वधारला तर धारवाड बटाटा 600 रु. व चांगला प्रतीचा स्थानिक बटाटा 100 रु. कमी झाला. कांद्याचे भाव मात्र स्थिर आहेत.
शनिवारी बाजारात 1200 पोती रताळी आवक होती. बेळगाव तालुक्यामधून बहुतांश आवक तर चंदगड तालुक्यामधून तुरळक प्रमाणात बाजारात आवक झाली होती. त्यामुळे रताळी दरात वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी बी. के. तरळे यांनी दिली.
बाजारात शनिवारी 45 ट्रक कांदा आवक होती. यामध्ये जुना कांदा 35 ट्रक होता. यामध्ये कर्नाटकमधून 10 ट्रक तर महाराष्ट्रामधून 25 ट्रक जुना कांदा होता. महाराष्ट्रातील कांदा आवक ही व्यापारी आणि शेतकरी बांधवांची होते. कर्नाटकातील संपूर्ण आवक ही शेतकरी बांधवांची होती. मागील बाजारात 50 ट्रक कांदा आवक होती. शनिवारी 5 ट्रक कांदा आवक कमी होऊनसुद्धा कांद्याचे भाव स्थिर होते. मोठय़ा प्रमाणात पाऊस होत असल्याने कांद्याचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी राजू पाटील यांनी दिली.
कांद्याचे भाव
नवीन गोळी- 100 ते 400 रु.
गुल्टा- 500 ते 800 रु.
मध्यम- 1000 ते 1500 रु.
गोळा- 1600 ते 2200 रु.
जुना कांदा
गोळी- 500 ते 1000 रु.
गुल्टा- 1200 ते 1800 रु.
मध्यम- 2000 ते 3000 रु.
गोळा- 3100 ते 4500 रु.
शनिवारी बाजारादिवशी परराज्यांतील बटाटा आवक मोठय़ा प्रमाणात वाढली. बाजारात 20 ट्रक बटाटा आवक होती. यापैकी इंदोर 12 ट्रक, हासन 4 ट्रक, आग्रा 2 ट्रक, धारवाड 2 ट्रक आवक होती. इंदोर आणि आग्रा बटाटय़ाचे भाव स्थिर होते. हासन बटाटा 200 रु. नी वधारला. धारवाडमधून आलेला बटाटा पावसामुळे भिजला होता. त्यामुळे त्याचा दर कमी झाला असल्याची माहिती व्यापारी सिद्धार्थ नरेगावी यांनी दिली.
बटाटय़ाचे भाव
इंदोर- 3000 ते 3500 रु.
आग्रा- 2800 ते 3200 रु.
हासन- 3000 ते 3600 रु.
धारवाड- 1500 ते 2200 रु.
बेळगाव स्थानिक बटाटा आवक कमी होती. कारण बटाटा उत्पादक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाऊस होता. त्यामुळे आवक कमी होऊनसुद्धा दरात घट झाली. कारण परराज्यांतील बटाटा आवक वाढल्याचा परिणाम चांगल्या प्रतीच्या बटाटा दरात 100 रु. घट झाली तर गोळी आणि मध्यम बटाटय़ाचे भाव स्थिर आहेत. मसार बटाटय़ाची आवक तुरळक प्रमाणात होत असल्याची माहिती व्यापारी वाय. बी. .चव्हाण… यांनी दिली.
गोळी- 800 ते 1000 रु.
मध्यम- 1800 ते 2700 रु.
गोळा- 3000 ते 3400 रु.
मसार- 2000 ते 2700 रु.