ऑनलाईन टीम / इंदौर :
मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये शिवसेना नेते रमेश साहू यांची बुधवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तेजाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरीखेडा येथे ही घटना घडली.
रमेश साहू हे एका ढाब्याचे मालक होते. ढाब्यावरच अज्ञातांकडून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी हत्येच्या तपासाला सुरुवात केली आहे. ढाब्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.