ऑनलाईन टीम / मुंबई :
पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. त्यानुसार, आज पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 25 पैशांनी वाढ झाली. डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 14 पैशांनी वाढ झाली आहे.
- मुंबईत पेट्रोलचा भाव 102.82 रुपये
मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटर 102.82 रुपये तर डिझेल 94.84 रुपये इतके झाले आहे. पुणे शहरात पेट्रोल 102. 48 रुपये प्रति लिटर तर डिझेल 93.05 रुपये प्रति लिटर इतके आहे. वाहन इंधनाच्या किंमतीत महिन्याभरातील ही 26 वी वाढ आहे. त्यात पेट्रोल 6.34 रुपयांनी महागले आहे. तर डिझेलमध्ये याच काळात 6.63 रुपयांची वाढ झाली आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.66 रुपये तर डिझेल 87.41 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 97.91 रुपये तर डिझेल 92.04 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 96.58 रुपये तर डिझेल 90.25 रुपये इतके वाढले आहे.
राजस्थानमध्ये एक लिटर 100 रुपये मोजावे लागत आहेत. जयपूरमध्ये पेट्रोल 103.29 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96.38 रुपये इतके आहे. हैदराबादमध्ये पेट्रोल 100.46 रुपये तर डिझेल 95.28 रुपये इतके आहे.