ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात सलग 19 व्या दिवशी डिझेलच्या किंमती वाढ झाली आहे. परंतु पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पहिल्यांदा असे झाले आहे की, डिझेलची किंमत पेट्रोल पेक्षाही वाढली आहे. भारतात पहिल्यांदाच डिझेलची किंमत 80 रुपयांच्यापुढे गेली आहे. मागील 19 दिवसात डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 10.63 रुपयांनी तर पेट्रोल 8.66 रुपयांनी वाढ झाली आहे.
गुरुवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 16 पैसे वाढली. त्यामुळे डिझेलची नवीन किंमत 79.92 झाली तर डिझेलच्या किंमतीत 14 पैसे वाढ झाल्याने नवीन दर 80.2 इतका झाला आहे. बुधवारी डिझेलच्या किंमतीत 48 पैसे वाढ झाली होती.
तर मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत अनुक्रमे 86.70, 86.61 आणि 83.18 रुपये आहे. तर डिझेलची किंमत अनुक्रमे 78.34, 75.18 आणि 77.29 इतकी झाली आहे.