‘एटीएफ’च्या दरात सहा महिन्यात 30 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विमानांच्या इंधन दरवाढीमुळे हवाई मार्गाने प्रवास केल्यास नजिकच्या काळात अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. ‘एटीएफ’च्या (एअर टर्बाईन फ्युएल) किंमतीत अचानक वाढ झाल्याने विमान कंपन्या आता प्रवासाचे तिकीटदर वाढवणार असल्याचे संकेत मिळत आहे. पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या महागाईनंतर आता आणखी एक महागाईचा झटका विमान प्रवाशांना बसणार आहे.
विमानात वापरल्या जाणाऱया इंधनाला एअर टर्बाईन फ्युएल (एटीएफ) असे संबोधले जाते. सध्या दिल्लीत ‘एटीएफ’ची किंमत वाढून 68,262 रुपये प्रतिकिलोलिटर झाली आहे. हाच दर कोलकातामध्ये 72,295 रुपये तर मुंबईत 66,482 रुपये इतका आहे. यावषी जानेवारीच्या तुलनेत हे प्रमाण 30 टक्क्मयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. जानेवारी 2021 मध्ये एटीएफचा दर 50,979 रुपये होता. दरम्यान, जागतिक बाजारातही कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम एटीएफवर देखील होत असल्याचे सांगितले जात आहे.