ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोलियम कंपन्यांनी आज आम जनतेला दिलासा दिला आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काहीच बदल झालेले नाहीत. मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले होते. मंगळवारी पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 29 पैशांनी वाढ झाली. डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर सोमवारी इंधन दर स्थिर होते.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 4 मे पासून आतापर्यंत 32 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित दिलासा मिळालेला दिसून येत आहे. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही दर वाढ झाली नाही.
मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटर 104.90 रुपये तर डिझेल 96.72 रुपये इतके झाले आहे. दिल्लीत पेट्रोल 98.81 रुपये तर डिझेल 89.18 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 99.80 रुपये तर डिझेल 93.72 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 98.64 रुपये तर डिझेल 92.03 रुपये इतके वाढले आहे.
- 135 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रूपयांपेक्षा अधिक
135 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. 4 मे पासून आतापर्यंत पेट्रोलची किंमत 8.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 8.45 रुपये प्रति लिटर इतके वाढले आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोलसाठी 105.54 रुपये मोजावे लागत आहेत. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बनसवारा, इंदूर, भोपाळ, ग्वालियर, गुंटूर, काकीनाडा, चिकमगलूर, शिवमोगा, पाटणा आणि लेहमध्ये पेट्रोल 100 रूपयांपेक्षा अधिक दराने मिळत आहे.