जिल्हय़ात शिवसेनेतर्फे निदर्शने
प्रतिनिधी/ रत्नागिरी
भाजपाप्रणित केंद्र शासनाच्या पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात व भाजपा नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शेतकरीविरोधी विधानाचा रत्नागिरी तालुका शिवसेनेसह संपूर्ण जिल्हाभरात शनिवारी जाहीर निषेध करण्यात आला. निदर्शनादरम्यान केंद्र सरकारच्या कृषीविषयक धोरणासह इंधन दरवाढीविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
शेतकरी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. या प्रश्नासोबतच पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या बाबत शिवसेनेच्यावतीने शनिवारी राज्यभर केंद्र सरकारविरोधात उग्र आंदोलने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुका शिवसेनेतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख तथा जि. प. बांधकाम व आरोग्य सभापती महेश म्हाप, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, रत्नागिरी तालुकाप्रमुख तथा नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा महिला संपर्क संघटक नेहा माने, महिला जिल्हा संघटक वेदा फडके, रत्नागिरी जिल्हा समन्वयक शिल्पा सुर्वे, उपजिल्हा संघटिका ममता जोशी, रत्नागिरी तालुका महिला संघटक कांचन नागवेकर, महिला विधानसभा क्षेत्रसंघटक विनया गावडे, उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, युवासेना तालुका युवाधिकारी तुषार साळवी, शहर संघटक प्रसाद सावंत, शहर युवाधिकारी अभिजित दुडे, पंचायत समिती उपसभापती दत्तात्रय मयेकर, ज्येष्ठ नगरसेविका स्मितल पावसकर, शहर संघटिका मनीषा बामणे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
खेड शिवसेनेतर्फे निवेदन
खेड: तालुका शिवसेनेच्यावतीने शनिवारी दुपारी गांधी चौक येथे केंद्र सरकारने वाढवलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात निदर्शने करत केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. दरवाढ कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, वाढत्या महागाईला आळा घालावा, अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना देण्यात आले. ही निवेदने केंद्र सरकारपर्यंत पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख निकेतन पाटणे, पंचायत समिती सभापती विजय कदम, शैलेश कदम, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, राकेश सागवेकर, वहाबसेन, दर्शन महाजन, संदीप कांबळे उपस्थित होते.
राजापुरात सेनेचे निदर्शन
राजापूर: वेगाने होणारी इंधन दरवाढ व शेतकऱयांसाठी जाचक कायद्यांविरोधात राजापूर तालुका शिवसेनेच्यावतीने येथील जवाहर चौकात निदर्शन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.राजापूर तालुका शिवसेनेने जवाहर चौकात निदर्शन केले. यावेळी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, सभापती प्रमिला कानडे, शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख दुर्वा तावडे, उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर, जिल्हा परिषद सदस्या दीपक नागले, भारती सरवणकर, सोनम बावकर, शहरप्रमुख संजय पवार, नगरसेवक विनय गुरव, सौरभ खडपे, शिवसहकार सेनेचे उपजिल्हा संघटक सुशांत मराठे, माजी जि. प. सदस्य शरद लिंगायत, विभाग संघटक उमेश पराडकर, पंचायत समिती सदस्य अभिजित तेली, प्रशांत गावकर, नरेश शेलार, मधु बाणे यांसह सेनेचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व शिवसैनिक उपस्थित होते.
चिपळुणात शिवाजी चौकात निदर्शने
चिपळूण: ‘पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी करा नाहीतर खुर्च्या खाली करा, रावसाहेब दानवेंचे करायचे काय खाली डोकं वरती पाय, केंद्र सरकारचा निषेध असो, मोदी सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत शनिवारी शहरातील शिवाजी चौकात शिवसैनिकांनी निदर्शने केली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, संदीप सावंत, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख उमेश सकपाळ, समन्वयक राजू देवळेकर, नगरसेवक शशिकांत मोदी, मनोज शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शहरप्रमुख निहार कोवळे यांच्यासह महिला आघाडीने शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी काही काळ येथील वाहतूक ठप्प झाली होती. निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना बाजूला करत रस्ता मोकळा केला.
संगमेश्वर शिवसेनेतर्फे केंद्र सरकारचा निषेध
ताम्हाने: संगमेश्वर तालुका शिवसेनेतर्फे शनिवारी देवरुखमध्ये भाजपाप्रणीत केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढीव दर व रावसाहेब दानवे यांच्या शेतकरीविरोधी विधानाचा यावेळी निषेध करण्यात आला. माजी राज्यमंत्री रवींद्र माने व माजी आमदार सुभाष बने यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला. निषेध मोर्चात सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जि. प. सदस्य संतोष थेराडे, जि. प. सभापती रजनी चिंगळे, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, माजी पं. स. सभापती सारिका जाधव, पं. स. उपसभापती प्रेरणा कानाल, देवरुखच्या माजी नगराध्यक्षा निलम हेगशेटय़े, कोसुंबचे माजी सरपंच राजू जाधव आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी राजेंद्र महाडिक व तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हे आंदोलन सुमारे पाऊण तास सुरु होते. यावेळी देवरुख पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.