वृत्तसंस्था/ मुंबई
शेअर बाजारामध्ये बुधवारी सलग दुसऱया सत्रामध्ये तेजी दिसून आली होती. सदरच्या दोन सत्रांमध्ये इक्विटीतील गुंतवणूक 7.21 लाख कोटी रुपयांनी वाढलेली दिसली आहे.
सेन्सेक्समध्ये 1200 अंकांची जबरदस्त वृद्धी दिसली आहे. मंगळवारी 581 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स व्यवहार करत होता. अशा रितीने सलग दोन दिवस सेन्सेक्सने तेजी कायम ठेवली होती. दोन दिवसामध्ये बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 7 लाख 21 हजार 949.74 कोटी रुपये वाढून 2 कोटी 48 लाख 32 हजार 780.78 कोटी रुपयांवर पोहोचले होते. या तेजीच्या आधी 28 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान सलग चार सत्रे बाजारामध्ये मोठी घसरण झाली होती. रिलायन्स, एचडीएफसी बँक आणि इंन्फोसिस या सारख्या दिग्गज कंपन्यांची हिस्सेदारी बाजाराला तेजी मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली.