नवी दिल्ली
इक्वीटी म्युच्युअल फंडामध्ये गेल्या एप्रिल महिन्यात 3 हजार 437 कोटी रुपयांची भर पडली असल्याचे समजते. तर मार्चमध्ये या फंडात 9 हजार 115 कोटीची भर पडली होती, जी 8 महिन्यानंतरची सर्वोच्च होती. जुलै 2020 ते फेब्रुवारी 2021 च्या एकंदर कालावधीत 47 हजार कोटींची भर इक्वीटी म्युच्युअल फंडात दिसून आली. याच काळात सेन्सेक्सही 40 टक्के इतकी तेजी दर्शवत होता. यात एसआयपी वा सिस्टमेटीक इन्वेस्टमेंट प्लॅनमार्फत होणारी गुंतवणूक ही सर्वात अधिक राहिली आहे.