इचलकरंजी/ प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील कुडचे मळा येथील यंत्रमाग कामगाराला कोरोनाची लागण झाल्यानंतर बुधवारी त्याच्या कुटुंबातील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पण उर्वरित त्याच्या कुटुंबातील 7 जणांचा व संपर्कातील एकाचा अहवाल बुधवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आला आहे. यामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या कुडचे मळा परिसरसह शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. 55 वर्षीय कोरोना बधिताच्या कुटुंबातील दोन मुले, दोन सुना व पाच नातवांपैकी 35 वर्षीय मुलगा व 11 वर्षीय नातीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरात भीतीचे वातावरण होते. पण उर्वरित 7 ही जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.
दातार मळा येथील वयोवृद्धांच्या संपर्कातील सहा जणांचे स्वाब घेण्यात आले असून त्यांचा अहवाल आज प्राप्त होण्याची शक्यता आहे.