शहरात भीतीचे वातावरण ; त्रिशूल चौक, गुरुकन्नननंनगर भागातील रुग्ण
प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजीत आज पुन्हा सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्रिशूल चौकातील कोरोना पॉझिटिव्ह मयत यांचा भाचा, पुतणी, मुलगा, पुतण्या अशा चार जणांना तर गुरु कन्नननगरमधील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील मुलगी आणि ६५ वर्षीय वडिलांचा समावेश आहे. शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६ झाली असून यातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरित ३७ जणांवर उपचार सुरू आहेत.