इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील लिंबू चौक ते तांबेमळ्याकडे जाणाऱ्या रोडवर गुटखा, सुगंधी तंबाखूची अवैधपणे वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली. त्यामधून 1 लाख 57 हजार 610 रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू आणि 1 लाख 20 हजार रुपये किमतीची कार असा एकूण 2 लाख 77 हजार 610 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत, कार चालकाला अटक केली. निखिल आणासो चौगुले (वय 30, रा. तांबे माळ, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव म्हणाले,लिंबू चौक ते तांबेमळ्याकडे जाणाऱ्या रोडवरुन कार मधून बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती बातमीदारकडून मिळाली. त्यावरून या रोडवर नाकाबंदी करून येणाऱ्या जाणाऱ्या कारची तपासणी सुरू केली. याच दरम्यान लिंबू चौकाकडून एक भरधावपणे येणारी दिसली. ती कार संशयावरुन अडवली व झडती घेतली. त्यावेळी कारच्या मागील शीट व डिग्गीमध्ये गुटखा व सुंगधी तंबाखूच्या ब्यागा आढळून आल्या. त्या ब्यागामध्ये 1 लाख 57 हजार 610 रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू मिळून आला. तो आणि 1 लाख 20 हजार रुपये किमतीची कार असा एकूण 2 लाख 77 हजार 610 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत, कार चालक निखिल चौगुले या युवकाला अटक केली. या कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव, खंडेराव कोळी, बालाजी पाटील, संजय इंगवले, आयुब गडकरी, सुरज चव्हाण, राजू कांबळे, यशवंत कुंभार आदींच्या पथकाने भाग घेतला