अड्डाचालकासह १६ जणांविरुद्ध गुन्हा : दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / इचलकरंजी
जवाहर नगर परिसरातील मुळीक गल्लीत सुरू असलेल्या १३ पानी जुगार अड्ड्यावर शिवाजी नगर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ४२ हजार ८०० रुपयांची रोकड, १२ मोबाईल, २ मोटारसायकली असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस नाईक प्रशांत ओतारी यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जवाहरनगर भागातील मुळीक गल्लीत नितीन मुळीक यांनी भाड्याने दिलेल्या खोलीत जुगार सुरू असल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी याठिकाणी छापा टाकला. यात प्रवीण महादेव स्वामी (वय २९, रा. साईनगर, चंदूर), मुकेश बाळू जावीर (वय २६, रा. विठ्ठल नगर), विनायक सुभाष भंडारे (वय ३९, रा. केटकाळे नगर), रामा भीमाण्णा वडर (वय ४०, रा. शहापूर), सागर बाबुराव दंताळ (वय ३९, रा. कळे, ता. पन्हाळा), राजशेखर भीमाशंकर मजगे (वय २८, रा. संत मळा), विनायक नारायण जगताप (वय ३६, रा. शाहूनगर चंदूर), तेजस कैलास मिणेकर (वय ३०), विशाल अण्णासो खोत (वय २५, दोघेही रा. विक्रमनगर), राजू श्रीकांत मेटे (वय ४७, रा. आभार फाटा), शहानवाज सिकंदर नायकवडे (वय ३७, रा. भारतमाता हौसिंग सोसायटी), विनोद उत्तमराव चौधरी (वय ४५, रा. चांदणी चौक), यांना डिग्गी जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. पप्पू श्रीकांत जाधव, महादेव गुंड, राजू मोमीन (तिघेही रा. जवाहर नगर) आणि नितीन मुळीक यांचा भाडेकरू आदी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री दहाच्या सुमारास शिवाजीनगर पोलिसांनी केली.