ऑनलाईन टीम/तरुण भारत
इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पार्कमधील विजेत प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड केमिकल या फॅक्टरी ला आज सकाळी सातच्या सुमारास आग लागली यामध्ये केमिकल फॅक्टरी चे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, तारदाळ जवळ असणाऱ्या आवडी टेक्स्टाईल पार्क मधील या केमिकल फॅक्टरी ला शॉर्टसर्किटने आग लागली आग इतकी मोठी होती की केमिकल असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते त्यामुळे घटनास्थळी असलेल्या कामगारांची पळापळ सुरू झाली यावेळी येथील नागरिकांनी याची माहिती इचलकरंजी अग्निशमन दल घोडावत अग्निशमन दल आणि जयसिंगपूर अग्निशमन दलाला याची माहिती दिली. यावेळी ५ गाड्या घटनास्थाळी दाखल झाल्यानंतर आग विझवण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, गटनस्थळी अग्निशमन दलाच्या सुमारे पाच गाड्या दाखल झाल्यानंतर तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग इतकी मोठी होती की सुमारे दोन किलोमीटर पर्यंत आगीचे लोट दिसून येत होते. तसेच शेजारीच असणार्या एका यंत्रमाग कारखान्यालाही आग लागली आहे. त्यांचीही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या केमिकल फॅक्टरी चे मालक विशाल कोथळे यांनी फॅक्टरीला लागलेली आग पाहताच त्यांना अश्रू अनावर झाले. ळ्यासमोर फॅक्टरी जळत असल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसलाय. यावेळी घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती तसेच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. या आगीमध्ये सुमारे त्यांची दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याच्या अंदाज व्यक्त केला जात आहे. तर आज सुट्टी असल्यामुळे आज फक्ट्री बंद होती. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.