नऊ मोबाईल, सहा दुचाकी आणि १४ हजाराची रोकड व जुगारचे साहित्य असा २ लाख ४४ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / इचलकरंजी
शहरातील नाईट कॉलेज परिसरात सुरु असलेल्या तीन पानी जुगार क्लबवर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा टाकला. क्लब मालकासह 12 जणांना अटक केली. त्याच्याकडून नऊ मोबाईल, सहा दुचाकी आणि १४ हजाराची रोकड व जुगारचे साहित्य असा २ लाख ४४ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.
रघूनाथ रावसाहेब पवार (रा. लिंगाडे मळा, इचलकरंजी), प्रेमराज श्रीराम जोशी (रा. पुजारी मळा, इचलकरंजी ), कैलास दतात्रय भांदिगरे (रा. साई मंदीराजवळ, कोरोची), गफूर बाबू बेपारी (रा. मॉर्डन हायस्कूल नजीक, इचलकरंजी), सचिन शामराव पाटील (रा. बावणे गल्ली, शिवाजीनगर, इचलकरंजी), श्रृषभ लक्ष्मण कणगंले ( रा.सदलगा, जि. बेळगाव), इस्माईल नजीर सुतार (रा. हनुमाननगर, जवाहरनगर, इचलकरंजी), अझरुद्दीन रमजान सलाटे (रा. दतनगर, कबनूर), तौफिक शब्बीर पटवेगार (रा. बौध्द समाज मंदिरनजीक, कोरोची), अर्जुन नंदकुमार वडे (आण्णा रामगोंडा शाळेजवळ, इचलकरंजी), सत्यम आनंदा खाडेकर (रा. लक्ष्मी मंदिराजवळ, कबनूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना शहरातील नाईट कॉलेज परिसरात तीन पानी जुगार क्लब सुरु असल्याची माहिती बातमीदारा कडून समजली. त्यांनी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला या क्लबवर कारवाई करण्याबाबतचा आदेश दिला. गुन्हे शोध पथकाने या क्लबवर गुरुवारी रात्री छापा टाकला. क्लब मालकासह 12 जणाना अटक करीत, नऊ मोबाईल, सहा दुचाकी आणि १४ हजाराची रोकड व जुगारचे साहित्य असा २ लाख ४४ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.