प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजी येथील नदीवेस नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध बनावट विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई केली. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बनावट विदेशी मद्याचे 10 बॉक्ससह 1 चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
इचलकरंजीत केलेल्या या कारवाईत 1 लाख 1 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्यउत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाचे निरीक्षक पी.आर. पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी केली.