२० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई, ८८००० रुपयांचा केला दंड वसुल
प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजी शहर वाहतूक शाखेने शहरामध्ये ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आणि नववर्ष स्वागत बंदोबस्तादरम्यान मोटार वाहन कायद्यानुसार २४९ वाहन चालकावर कारवाई करण्यात आली असून, यामध्ये २० दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये एकूण ८८ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोली उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या आदेशाने शहरामध्ये ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आणि नववर्ष स्वागत वेळी हुल्लडबाज युवकाच्या विरोधी आणि दारू पिऊन वाहन चालविणारे वाहन चालक व ट्रिपल सीट चालविऱ्या दुचाकी चालकांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी शहर वाहतुक नियंत्रण शाखेने मोटार वाहन कायद्यानुसार २४९ वाहन चालकावर कारवाई करण्यात आली. यामध्ये २० मद्यपी वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये एकूण ८८ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.