प्रतिनिधी/इचलकरंजी
येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांची उपसंचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई येथे तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर अकोट (जि. अकोला) नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्याचे उपसचिव कैलास बधन यांनी दिले आहेत.