इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला छत्रपती श्री शिवाजी महाराज नामकरण करावे. या मागणीसाठी माजी मंत्री व आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्व हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांच्या समवेत मध्यवर्ती बस स्थानकामध्ये काही काळ ठिय्या आंदोलन केले आहे.
अधिक माहिती अशी, शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर छत्रपती श्री शिवाजी महाराज मध्यवर्ती बस स्थानक , इचलकरंजी अशा नामक बोर्ड लावण्यात आला होता. तो बोर्ड एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी काढून टाकला होता. त्यामुळे माजी मंत्री व आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्व हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांच्या समवेत शनिवारी मध्यवर्ती बसस्थानकाच्या इमारतीवर छत्रपती श्री शिवाजी महाराज मध्यवर्ती बस स्थानक, इचलकरंजी असा नामक बोर्ड परत लावावा, या मागणीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्व हिंदूत्ववादी कार्यकर्त्यां समवेत मध्यवर्ती बस स्थानकामध्ये शनिवारी आले. बसस्थानक प्रमुखासह सर्व अधिकाऱ्यांच्याबरोबर चर्चा केली. या पूर्वी लावलेला छत्रपती श्री शिवाजी महाराज मध्यवर्ती बस स्थानक, इचलकरंजी या नावाचा फलक पूर्वत लावावा. अन्यथा ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा देवून, बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दाराच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले.
याची माहिती समजताच पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी, मोठया पोलीस फौजफाट्यासह आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यामुळे बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दाराच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. याच दरम्यान या आंदोलनाची माहिती राज्याचे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांना समजली. त्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्याबरोबर फोनवरुन संपर्क साधून चर्चा केली. चर्चेदरम्यान मंत्री सतेज पाटील यांनी या विषयी 2 मार्च रोजी मुंबईमध्ये राज्याचे परिवहन अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यातयेईल. या बैठक इचलकरंजी मधील मध्यवर्ती बस स्थानकाला छत्रपती श्री शिवाजी महाराजमध्यवर्ती बस स्थानक, इचलकरंजी असे नाव देण्याबाबत धोरणात्मक ठरविण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आमदार आवाडेंनी आपले आंदोलन काही काळासाठी स्थगित केले.
या आंदोलनात नगरसेवक सुनिल पाटील, नगरसेवक राजू बोंद्रे, नगरपालिका पाणी पुरवठा समितीचे सभापती दिपक सुर्वे, प्रकाश दत्तवाडे, भारत बोगार्डे, संजय जाधव, प्रा. शेखर शहा, मोहन मालवणकर, पुंडलिक जाधव आदीनी सहभाग घेतला होता.