इचलकरंजी / प्रतिनिधी
मोक्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. मारती बाळू हेरवाडे ( वय २६ , रा . श्री बिदेव मंदिरानजीक धरणगुत्ती, ता . शिरोळ असे यांचे नाव आहे. तो गेल्या दोन वर्षापासून फरारी असून, त्याला पुणे येथील विशेष मोका न्यायालयाने फरारी घोषीत केले आहे. त्याला शनिवारी दुपारी बोरगांव – शिवनाकवाडी ( ता. शिरोळ ) रस्त्यावर पकडण्या आले आहे. अशी माहिती इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.