बेळगाव/ क्रीडा प्रतिनिधी
आनंद अकादमी कोचींग स्पोर्टस् क्लब आयोजित 19 वर्षाखालील आंतर कॅम्प क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इचलकरंजी संघाने आनंद अकादमी बी संघाचा 52 धावांनी पराभव करून एसीए चषक पटकाविला. श्रवण निकमला मालिकावीर तर तुषार चौगुलेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
भुतरामट्टी येथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इचलकरंजी संघाने प्रथम फलंदाजी करताना 32.3 षटकात सर्वबाद 168 धावा केल्या. त्यात सुदर्शन कुभारने 10 चौकारांसह 50, तनय पावसकरने 4 चौकारांसह 27 धावा केल्या.
आनंद अकादमीतर्फे सिद्धार्थ हुल्लोळी व ज्ञानेश होनगेकर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल आनंद अकादमी बी संघाचा डाव 32.3 षटकांत सर्व गडी बाद 116 धावात गुंडाळला. त्यात तुषार चौगुलेने 8 चौकारांसह 49, प्रसाद सुगूरने 4 चौकारांसह 18 धावा केल्या. इचलकरंजीतर्फे श्रवण निकमने 4 गडी बाद केले. या सामन्यात इचलकरंजी संघाने 52 धावांनी जिंकून चषकावर आपले नाव कोरले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे परस्कृर्ते माजी रणजी क्रिकेटपटू नंदकुमार मलतवाडकर, प्रवीण रामगोंडा, आनंद करडी यांच्या हस्ते विजेत्या इचलकरंजी संघाला उपविजेत्या आनंद अकादमी बी संघाला चषक देवून गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार तुषार चौगुले (कचलकरंजी, प्रभावी खेळाडू करण पुजारी, उत्कृष्ट गोलंदाज, तनय पावसकर (इचलकरंजी) तर श्रवण निकम (इचलकरंजी) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.