वृत्तसंस्था/ गिझा
इजिप्तच्या राष्ट्रीय महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार फैझा हैदरची येथील एका व्यावसायिक पुरूषांच्या फुटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
36 वर्षीय फैझा आता इजिप्तमधील एका व्यावसायिक फुटबॉल क्लबच्या पुरूष संघाला मार्गदर्शन करणार असून फुटबॉल क्षेत्रातील ही पहिलीच घटना आहे. इजिप्तमधील फोर्थ डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेतील आयडियल गोल्डी फुटबॉल क्लबशी फैझाने नुकताच करार केला आहे.