ऑनलाईन टीम / कैरो :
पिरॅमिडचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इजिप्तमध्ये अंदाजे 2500 वर्षांपूर्वीच्या 27 शवपेट्या आढळून आल्या आहेत. इजिप्तच्या पर्यटन व दुर्मीळ वस्तू मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
कैरोच्या दक्षिणेला असलेल्या सक्कर येथे पुरातत्व शास्त्रज्ञांना 36 फूट खोल विहिरीत या शवपेट्या सापडल्या आहेत. या पेट्या लाकडी आहेत. त्यावर नक्षीकाम करून पेट्या लाल, काळ्या, पांढऱ्या, निळ्या आणि सोनेरी रंगाने रंगविण्यात आल्या आहेत. या शवपेट्यांचे संशोधन करण्याचे काम सुरू झाले आहे.
सक्करचा परिसर 3000 वर्षांपासून मृतदेह गाडण्यासाठी ओळखला जातो. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, मागील 15 दिवसांपूर्वीही सक्कारा येथे उत्खनन करताना पुरातत्त्व संशोधकांना जमिनीत 40 फूट खोलवर एकावर एक अशा पुरण्यात आलेल्या 13 शवपेट्या सापडल्या होत्या.