मुंबई
ऑनलाइन ट्रव्हल कंपनी इझी ट्रीप प्लॅनर्स यांचा आयपीओ पुढच्या आठवडय़ामध्ये 8 मार्चला शेअर बाजारात सादर केला जाणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 510 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. कंपनीने यासंदर्भातली माहिती व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून नुकतीच दिली आहे. सदरच्या इशूसाठी 186 ते 187 रुपये प्राईस बँड ठेवण्यात आला आहे. सदरच्या इशूमार्फत कंपनीचे संस्थापक आणि प्रवर्तक निशांत पीट्टी आणि रिकांत पीट्टी हे 255 कोटी रुपयांचे समभाग विक्री करणार आहेत. निशांत यांच्याकडे कंपनीची 49.81 टक्के इतकी तर रिकांत यांच्याकडे 49.68 टक्के इतकी किस्सेदारी आहे.