प्रतिनिधी / बेळगाव
इटनाळ, ता. रायबाग येथील बसवेश्वर मंदिरात आढळून आलेल्या एक दिवसीय अर्भकाला वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बालविकास अधिकाऱयांनी या अर्भकाला सिव्हिलमध्ये दाखल केले आहे.
गुरुवारी सकाळी एक दिवसाचे अर्भक आढळून आले होते. स्थानिक नागरिकांनी रायबाग येथील महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱयांना यासंबंधीची माहिती दिली होती. अंगणवाडी कार्यकर्त्यांनी त्या अर्भकाला ताब्यात घेऊन सुरुवातीला रायबाग येथील सरकारी इस्पितळात त्याला दाखल केले.
8 एप्रिल रोजी रात्री त्याचा जन्म झाला आहे. त्याच्या पुढील पालनपोषणासाठी अधिकाऱयांनी या अर्भकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सोबत महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी व अंगणवाडीच्या सेविकाही आहेत. हारुगेरी पोलीस स्थानकात या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.