वृत्तसंस्था/ लंडन
इटलीच्या टॉप सीडेड मॅटो बेरेटिनीने रविवारी येथे एटीपी टूरवरील क्विन्स क्लब पुरूषांच्या ग्रास कोर्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना ब्रिटनच्या नुरीचा पराभव केला.
या स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात 25 वर्षीय बेरेटिनीने ब्रिटनच्या कॅमेरून नुरीचा 6-4, 6-7 (5-7), 6-3 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. एटीपी टूरवरील बेरेटिनीचे हे पाचवे विजेतेपद आहे. एटीपीच्या क्रमवारीत इटलीचा बेरेटिनी नवव्या क्रमांकावर आहे.