टोरँटो : एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या टोरँटो मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या यानिक सिनरचे आव्हान दुसऱया फेरीतच संपुष्टात आले. जेम्स डकवर्थने सिनरचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
19 वर्षीय सिनरने दोन दिवसापूर्वी वॉशिंग्टनमधील टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर टोरँटो स्पर्धेत सिनरला पहिल्या फेरीत पुढेचाल देण्यात आली होती. दुसऱया फेरीतील सामन्यात जेम्स डकवर्थने सिनरचा 6-3, 6-4 असा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या डकवर्थचा पुढील फेरीतील सामना मेदवेदेव्हशी होणार आहे. सर्बियाच्या लेजोव्हिकने कॅनडाच्या ऍलीसिमेचा 7-5, 6-4, दक्षिण आफ्रिकेच्या हॅरीसने स्पेनच्या लोपेझचा 6-2, 6-3 असा पराभव केला.