ऑनलाईन टीम / रोम :
इटलीत 23 लाख 36 हजार 279 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामधील 80 हजार 848 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
इटलीत गुरुवारी 17 हजार 246 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 522 जणांचा मृत्यू झाला. 23.36 लाख रुग्णांपैकी 16 लाख 94 हजार 051 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 5 लाख 61 हजार 380 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2557 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत इटलीचा जगात आठवा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत सहावा लागतो. इटलीत आतापर्यंत 2 कोटी 84 लाख 60 हजार 704 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.