ऑनलाईन टीम / रोम :
इटलीत कोरोनाबळींच्या संखेने 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. या देशात आतापर्यंत 14 लाख 31 हजार 795 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामधील 50 हजार 453 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
इटलीत सोमवारी 22 हजार 930 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 630 जणांचा मृत्यू झाला. 14.31 लाख रुग्णांपैकी 5 लाख 84 हजार 493 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 7 लाख 96 हजार 849 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 3810 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत इटलीचा जगात आठवा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत सहावा क्रमांक लागतो. इटलीत आतापर्यंत 2 कोटी 5 लाख 37 हजार 521 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.