ऑनलाईन टीम / रोम :
इटलीत कोरोनाबळींच्या संखेने 75 हजारांचा आकडा ओलांडला आहे. या देशात आतापर्यंत 21 लाख 55 हजार 446 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामधील 75 हजार 332 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
इटलीत रविवारी 14 हजार 245 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 347 जणांचा मृत्यू झाला. 21.55 लाख रुग्णांपैकी 15 लाख 03 हजार 900 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 5 लाख 76 हजार 214 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2583 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत इटलीचा जगात आठवा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत पाचवा क्रमांक लागतो. इटलीत आतापर्यंत 2 कोटी 69 लाख 26 हजार 279 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.