ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, इटलीमध्ये या रोगाने बळी जाणाऱयांची संख्या आता 9134 पर्यंत पोहोचली आहे. जगातील ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाची इटलीत 86 हजार 498 जणांना बाधा झाली असून, 10950 जण या आजारातून बरे झाले आहेत.
जगभरातील 193 देश कोरोनाच्या विळख्यात अडकले असून, इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बळी गेले आहेत. त्यांनतर आता अमेरिकेत या विषाणूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होत आहे. जगभरात आतापर्यंत 5 लाख 97 हजार 267 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 27365 जण या आजारातून दगावले आहेत. 1 लाख 33 हजार 363 जण या आजारातून बरे झाले आहेत.