शहरातील सलून व्यावसायिकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे सरकारने अनेक व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले आहे. मात्र, यामध्ये सलूनसारख्या गरीब घटकालाही दुकाने बंद करण्यास सांगितल्यामुळे पुन्हा सलून व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मागील वेळी मोठा फटका या व्यवसायालाच बसला होता. मात्र, आता आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. इतर व्यावसायिकांप्रमाणे सकाळी 6 ते 10 पर्यंत दुकाने सुरू करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी श्री संतसेना महाराज समाजोन्नती संघ, गाडेमार्ग, शहापूर व सलून व्यावसायिक संघटना शहापूर यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सलून व्यावसायिक गरीब आहेत. हा व्यवसाय करणाऱयांना इतर कोणताही व्यवसाय करणे अशक्मय आहे. दुकाने थाटण्यासाठी अनेकांनी कर्जे घेतली आहेत. या क्लोजडाऊनमुळे आम्हाला ती कर्जे फेडणे अशक्मय आहे. या व्यवसायावरच आम्ही आजपर्यंत जीवन जगत आहे. यावर अनेक कामगार तसेच कुटुंबीय अवलंबून आहेत. असे असताना आमची दुकाने बंद करण्याचा आदेश दिल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा आम्हालाही इतरांप्रमाणे सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सलून संघटना अध्यक्ष राजू सूर्यवंशी, सेपेटरी संतोष शिवणगेकर, समाजाचे अध्यक्ष उमेश मुगळीकर, उपाध्यक्ष संजय भोगुलकर, सेपेटरी संदीप जाधव, सुनील सारंग, अमर कडगावकर, गोपाल आगलेकर, संदीप जाधव, पुंडलिक चव्हाण, प्रसाद सपकाळ यांच्यासह सलून व्यावसायिक उपस्थित होते.