महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांचे पिसेदेव सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभात प्रतिपादन
प्रतिनिधी / खानापूर
ग्रामीण भागात पंचवीस वर्षे सहकार साधना करून व्यवहारापलीकडे माणसे जोडण्याचे काम पिसेदेव सोसायटीने केले आहे. समाजाच्या समृद्धीत आपली प्रगती मानणाऱया इथल्या संचालकांचा अन्य संस्थांनी आदर्श घेण्याची गरज आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या या संस्थेने सभासदांचा विश्वास सार्थ ठरविला असल्याचे प्रतिपादन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी केले.
इदलहोंड येथील श्री पिसेदेव मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक माजी आमदार दिगंबर पाटील होते.
सह्याद्री पतसंस्थेचे चेअरमन पी. पी. बेळगावकर म्हणाले, पायाभूत सुविधा आणि सर्व प्रकारच्या विकासापासून दूर असलेल्या खानापूर तालुक्मयाच्या ग्रामीण भागात अडीच दशकापूर्वी अनेक सहकारी संस्थांनी आर्थिक परिवर्तनाचा पाया घातला. शेतकरी आणि कष्टकऱयांच्या आर्थिक गरजेला सक्षम पर्याय उभा केला. त्यातूनच आज तालुक्मयात सुबत्ता व समृद्धीची गंगा वाहताना दिसत आहे.
पारदर्शक व्यवहारामुळे संस्था नावारूपाला
साहित्यिक गुणवंत पाटील म्हणाले, 13 कोटीच्या ठेवी आणि खानापूर व बेळगाव तालुक्मयात 4 शाखांची निर्मिती करून या संस्थेने आपला विस्तार वाढवलेला आहे. संस्थापक माजी आमदार दिगंबर पाटील यांचे खंबीर नेतृत्व, संचालकांची त्यांना साथ आणि पारदर्शक व्यवहारामुळे संस्था नावारूपाला आली आहे.
जांबोटी पतसंस्थेचे चेअरमन विलास बेळगावकर म्हणाले, सरकारच्या विविध जाचक धोरणामुळे सहकारक्षेत्र अडचणीत आले. असे असतानाही पिसेदेव सोसायटीने 25 वर्षात केलेले उल्लेखनीय कार्य अभिनंदनास पात्र आहे. माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, खानापूर तालुक्मयाच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोलाचे योगदान आहे. विविध पतसंस्था आणि प्राथमिक कृषी सहकारी संघांनी शेतकरी व कष्टाला प्रति÷ा मिळवून दिली आहे. सभासदांनी संस्थेवरील विश्वास कायम ठेवावा, असे आवाहन केले.
रौप्यमहोत्सवानिमित्त आजी-माजी संचालक, सल्लागार व सभासद यांचा चांदीचे नाणे, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर चेअरमन आनंद पाटील, व्हा. चेअरमन जोतिबा चोपडे, संचालक सुभाष नार्वेकर, मनोहर जाधव, रमेश देसाई, गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. ओ. पाटील, मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील, प्राथमिक कृषी संघाचे चेअरमन शिवाजी पाखरे आदी उपस्थित होते.
जनरल मॅनेजर सुरेश पाटील यांनी स्वागत केले. वासुदेव चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. नारायण सावंत यांनी आभार मानले.