खानापूर / बातमीदार
इदलहोंड हायस्कूलमध्ये जिजामाता विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन व माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 4 रोजी गुरुवर्य शामराव देसाई यांचा 49 वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळा सुधारणा मंडळाचे सभासद विठ्ठल जाधव, सौ. सुनिता चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार दिगंबर पाटील यांनी गुरुवर्यांच्या प्रतिमेस हार घालून पूजन केले. कोरोनासारख्या महामारीमुळे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक पी. ओ. पाटील यांनी केले. तर सहशिक्षक जी. एस. धामणेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक उपस्थित होते.