समारंभाला इनरव्हीलच्या डिस्ट्रीक्ट चेअरपर्सन रत्ना बेहरे उपस्थित राहणार
प्रतिनिधी /बेळगाव
इनरव्हील क्लब ऑफ बेळगावचा अधिकारग्रहण समारंभ दि. 14 रोजी दुपारी 4.30 वा. झूम मिटींगद्वारे होणार आहे. यावेळी नूतन अध्यक्षा म्हणून डॉ. सुषमा शेट्टी, सचिव डॉ. सविता कद्दू आणि त्यांची कार्यकारिणी अधिकारग्रहण करणार आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून इनरव्हीलच्या डिस्ट्रीक्ट चेअरपर्सन रत्ना बेहरे उपस्थित राहणार आहेत.
परिचय पुढीलप्रमाणे-
डॉ. सुषमा शेट्टी
डॉ. सुषमा शेट्टी या कै. लक्ष्मी अंकोला व डॉ. क्ही. जी. अंकोला यांच्या कन्या आहेत. त्या बीएचएमएस पदवीधर आहेत. 2008 मध्ये त्यांनी क्लबमध्ये प्रवेश केला व अनेक पदांवर काम केले. बेस्ट आयएसओ, सलग दोनवेळा आऊटस्टॅंडिंग इनरव्हील मेंबर, बेस्ट कॅप्टन, पिलर ऑफ द क्लब असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. कन्नड वैश्य संघाच्या त्या माजी अध्यक्षा आहेत. त्यांचे पती डॉ. श्रीधर शेट्टी हे सुद्धा रोटरीचे सदस्य असून पेशाने सर्जन
आहेत.
डॉ. सविता कद्दू
डॉ. सविता कद्दू यांनी डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेज सोलापूर येथून एमबीबीएसची पदवी घेतली. पनवेलच्या एर्ना मेडिकल कॉलेजमध्ये काहीकाळ काम केले. त्या आयएमए, बॅग्पा, इनरव्हील क्लब, जितो लेडिज विंग, जायंट्स इंटरनॅशनल, बेळगाव ऍलोपॅथीक फॅमिली फिजिशियन असोसिएशन, एकल अभियान या संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना भोजराज पुरस्कार, राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार, राज्योत्सव पुरस्कार मिळाले आहेत.
तेजस्विनी हजारे
तेजस्विनी या बी. कॉम. पदवीधर असून हजारे किचन वेअरचे संचालक किशोर यांच्या समवेत त्या व्यवसाय पाहतात. त्यांना गायन, नृत्य आणि प्रवासाची आवड आहे.
रत्ना बेहरे
इनरव्हील डिस्ट्रीक्ट 317 च्या डिस्ट्रीक्ट चेअरपर्सन म्हणून बेळगावच्या रत्ना बेहरे यांची निवड झाली. 59 क्लबमधून हा बहुमान त्यांना मिळाला आहे. त्या मूळच्या तामिळनाडू येथील रामेश्वरमच्या. त्या समाजशास्त्राच्या पदवीधर आहेत. विवाहानंतर त्या बेळगावला आल्या. 2001 मध्ये त्यांनी क्लबमध्ये प्रवेश केला. इनरव्हील क्लबचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले तसेच विविध प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी चेअरमन म्हणूनही काम केले. क्लबच्या निधी संकलनासाठी 2005 मध्ये त्यांनी व्हिडिओकॉन, परिक्रमा, टेड फेअरचे भव्य आयोजन केले. त्यांनी क्लबमध्ये सचिव, उपाध्यक्ष व अध्यक्ष अशी पदे भूषविली. अध्यक्षीय कारकिर्दीत क्लबला त्यांनी अनेक पुरस्कार मिळवून दिले. क्लबच्या माध्यमातून त्या विविध प्रांतामध्ये झालेल्या परिषदा, प्रशिक्षण कार्यक्रम यामध्ये सहभागी झाल्या आहेत.
मैत्रभाव जपत सेवाकार्य
इनरव्हील क्लब ऑफ बेळगावचा अधिकारग्रहण समारंभ आज होत असून, त्यानिमित्त-
इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव ही आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लबशी संलग्न महिलांची संस्था आहे. 1977 मध्ये बेळगावला सुरुवात झाली. आज 99 देशांमध्ये एक लाख महिला या क्लबशी जोडल्या गेल्या आहेत. ‘मैत्री आणि सेवा’ हे क्लबचे ब्रीद असून इनरव्हील बेळगाव क्लबने आजवर त्याला अनुसरूनच कार्य केले आहे.
या क्लबने 36 क्रमांक शाळा दत्तक घेतली आणि तिचा पूर्ण कायापालट केला. या शाळेत वैद्यकीय शिबिरे घेणे, गणवेश देणे, खेळाची उपकरणे देणे, आवश्यक साहित्याची मदत करणे, असे अनेक उपक्रम राबविले आणि अलीकडेच हॅपी स्कूल प्रकल्पांतर्गत येथे स्वच्छतागृह, स्वतंत्र वर्ग, स्टाफ रूम, स्वयंपाक घर अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या. येथे एलसीडी प्रोजेक्टरही बसविला. अशाच पद्धतीचा कायापालट शाळा नं. 25 मध्येही करण्यात आला. या शाळेत नवीन फरशा बसवून रंगरंगोटी केली. बाक देण्यात आले व ग्रंथालय सुरू करण्यात आले.
किल्ला येथील मतिमंद मुलांच्या आराधना शाळेला नवीन छप्पर, वर्गखोल्या, खेळाचे साहित्य देण्यात आले व शाळा रंगविण्यात आली. आर्ष विद्या केंद्र येथेही सुविधा उपलब्ध करून कार्यशाळा घेण्यात आल्या. यावषी अनाथाश्रमातील मुलांना एन्फ्लूएन्झा औषधे देण्यात आली. दिव्यांगांच्या संस्थेला कृत्रिम पाय, कुबडय़ा, तिचाकी, व्हीलचेअर देण्यात आल्या. इनरव्हील अवयवदान चळवळीत सक्रिय आहे. विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स पंडित ही स्पर्धा घेतली जाते. मुलींसाठी व महिलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा घेतल्या जातात. या क्लबला संस्थापक अध्यक्षा माकी कापडिया तसेच पीडीजी लता कित्तूर यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते. यंदा रत्ना बेहरे या क्लबच्या सदस्या चेअरमन म्हणून निवडल्या गेल्या आहेत, ही क्लबसाठी प्रति÷sची बाब आहे.
-परिचित