प्रतिनिधी / बेळगाव
इनरव्हील क्लबतर्फे ‘दर्श’ उपक्रमांतर्गत पिरनवाडी येथील केएलएस इंग्रजी माध्यम शाळेत डॉ. कमलाकर आचरेकर यांचे व्याख्यान झाले. त्यांनी पौगंडाअवस्थेतील मुलांची मानसिकता त्यांच्या शरीरात होणारे बदल, त्यांच्या मनात येणारे विचार, त्यावर नियंत्रण कसे मिळवावे, अशा सर्व मुद्दय़ांवर मार्गदर्शन केले.
शाळेचे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांनी पौगंडावस्थेतील विविध बदल टिपणारी भित्तीपत्रके तयार केली होती. याच वयात न कळत मार्गचुकतो, व्यसानांची सवय लागते. त्यामुळे कोणतेही व्यसन करणार नाही आणि आपले उद्दीष्ट ठरवून त्यासाठी प्रयत्न करणार, अशी शपथ डॉ. आचरेकर यांनी विद्यार्थ्यांकडून घेतली. यावेळी क्लबच्या अध्यक्षा डॉ. सुषमा शेट्टी, दर्शच्या आणखीन एक वक्त्या स्मीता दळवी, किर्ती टेंबे आदी उपस्थित होत्या.