ओटवणे /प्रतिनिधी-
इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीचा पदग्रहण सोहळा मृणालिनी कशाळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या सन २०२१-२२ या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून सुहासिनी तळेगावकर, सेक्रेटरी म्हणून दर्शना रासम, खजिनदार म्हणून पूजा पोकळे तर आय एस ओ म्हणून सोनाली खोजूर्वेकर, एडिटर म्हणून भारती देशमुख यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुहासिनी तळेगावकर यानी इनरव्हील क्लबच्या सुरुवातीपासून राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. एक जुलै रोजीच्या डॉक्टर डे कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सुहासिनी तळेगावकर यांच्या हस्ते गवती चहा व तुळस या औषधी वनस्पतींच्या रोपांचे वितरण करण्यात आले. तसेच कोविड व ऋतुचर्या यावर डॉ शुभदा करमळकर यांनी मार्गदर्शन केले. गुरुपौर्णिमानिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रमुख परिचारिका श्रीमती कारेकर यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ शुभदा करमरकर यांच्या सहकार्याने इनरव्हील मेंबरसाठी सात दिवसांचे ऑन लाईन योगा शिबीर घेण्यात आले. तसेच रोटरी क्लबच्या सहकार्याने स्तनपान सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांना ब्लांकेट्स तर मातांसाठी खजूर व मास्कचे वितरण करण्यात आले.
यावेळी स्त्री रोग तज्ञ डॉ नेत्र सावंत यांनी स्तनपानाचे महत्व समजावून सांगितले. आहार तज्ञ विनया बाड यांनी पावसाळ्यात मातांचा आहार कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सुहासिनी तळेगावकर यांनी वर्षभरात विविध समाजपयोगी उपक्रम राबवण्याचा मनोदय व्यक्त केला.