अभिनेत्री ईशा गुप्ता देखील झळकणार
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी देखील आता वेबसीरिजच्या जगतात पाऊल ठेवणार आहे. इनविजिबल वुमन या वेबसीरिजच्या माध्यमातून सुनील शेट्टी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन राजेश एम. सेल्वा करत आहेत. तर ही एक ऍक्शन-थ्रिलर वेब सीरिज आहे.
इनविजिबुल वुमन वेबसीरिजच्या कथेने मी आकर्षित झालो. माझ्या या अनोख्या वेब पदार्पणावरून मी उत्सुक आहे. याचे चित्रिकरण सुरू झाले असून यूडली फिल्म्सची ही पहिली सीरिज असल्याचे त्याने सांगितले आहे. या सीरिजमध्ये ईशा गुप्ता एका महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. ईशाने अलिकडेच नकाब या वेबसीरिजमध्ये पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारली होती.
सुनील शेट्टी यंदा प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई सागा’ चित्रपटात दिसून आला होता. मागील काही काळापासून तो दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत सुनीलचा पुत्र अहान शेट्टी आता तडप चित्रपटाद्वारे पाऊल ठेवणार आहे. हा चित्रपट 3 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.