बेळगाव शहर, उपनगरांमध्ये कार चोरीच्या घटना वाढल्याने चिंता
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये कार चोरीच्या घटना वाढल्या आहेत. खास करुन इनोव्हा कार चोरण्यात येत आहेत. यासाठी एक हायटेक टोळीच कार्यरत असून केवळ आठवडाभरात तीन कार चोरण्यात आल्या आहेत. बेळगाव पोलीस या टोळीच्या मुसक्मया आवळण्याच्या प्रयत्नात आहेत.
घरासमोर उभी करण्यात आलेली इनोव्हा कार चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवबसवनगर, माळमारुती परिसरातून दोन इनोव्हा व शहापूर येथील येडियुराप्पा मार्गावर उभी करण्यात आलेली एक ऑडी अशा तीन कार केवळ आठवडाभरात चोरण्यात आल्या आहेत.
दुचाकी चोरणारे नेहमी हिरोहोंडा स्प्लँडर चोरतात. कारण बजारपेठेत त्याला दर चांगला मिळतो. या पाठोपाठ आता होंडा ऍक्टीव्हा चोरण्याचे प्रकारही वाढले आहेत. आता तर केवळ इनोव्हा आणि इतर किंमती कार पळविणारी हायटेक टोळी कार्यरत आहे.
केवळ आठवडय़ाभरात तीन कारची चोरी झाली आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱयांनी या टोळीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. इनोव्हा चोरण्यामागे आंतरराज्य चोरटे असणार असा संशय आहे. ज्यांची इनोव्हा आहे त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण घरासमोर उभी करण्यात आलेली कार क्षणाधार्थ पळविण्याची कसब या टोळीतील गुन्हेगारांना ज्ञात आहे.