नवी दिल्ली
टोयोटा किर्लोस्कर मोटर यांनी शुक्रवारपासून आपल्या नवीन इनोव्हा क्रिस्टाचे बुकिंग सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना फक्त 50 हजार रुपये इतकी रक्कम भरुन क्रिस्टा बुक करता येणार असल्याची माहिती यावेळी कंपनीने दिली आहे.
कंपनीने टोयोटा इनोव्हाचे पहिले मॉडेल हे वर्ष 2005 मध्ये सादर केले होते, तेव्हापासून कंपनीने लाखो युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीच्या मतानुसार नवीन इनोव्हा क्रिस्टा सुधारित प्रंट फॅशनसह सादर केली आहे. गाडी अशा तऱहेने डिझाइन केली आहे की व्यापारी, कॉर्पोरेट्स व फ्लीट मालकांसह सर्वसामान्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करते.
भारतामधील आयकॉनिक इनोव्हाचा प्रवास
2005 मध्ये इनोव्हा सादर करण्यात आल्यापासून हे मॉडेल देशातील एक आयकॉनिक मॉडेल राहिले असल्याचा दावा टोयोटा किर्लोस्कर मोटारचे विक्री धोरणात्मक विपणनचे उपाध्यक्ष अतुल सूद यांनी यावेळी केला आहे.