आगामी 2023 पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचा संकल्प
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक पातळीवर डिजिटल सेवा आणि उत्पादन कंपनी इन्फोव्हिजन इंक ही आगामी वर्षात म्हणजे 2023 पर्यंत देशात आपल्या विकास केंद्रांमध्ये जवळपास 2,000 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची नियुक्ती करणार असल्याची माहिती आहे. याकरीता कंपनी एक विशेष योजना राबविणार असल्याचेही यावेळी स्पष्टीकरण दिले आहे.
इन्फोव्हिजनने दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2021-22 मध्ये कंपनीने व्यवसायामध्ये वृद्धीसह मजबूत कामगिरी केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सध्याचा कंपनीचा व्यवसाय विस्तार
सध्याच्या कालावधीत विस्ताराच्या ठिकाणांमध्ये पुणे, बेंगळूर, चेन्नई, हैदराबाद आणि कोईमतूर आदी ठिकाणी व्यवसायाची वृद्धी केल्याची माहिती दिली आहे.
भारतामध्ये गुंतवणुकीचे संकेत अमेरिकन कंपनी ही आगामी वर्षापर्यंत जवळपास 2000 इंजिनियर्सची नियुक्ती करुन आपली सेवा अधिक मजबूत करणार आहे. येत्या काळात भारतामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्याची योजना आखली जाणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.