नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने अमेरिकेतील कंपनी ब्ल्यू अकॉर्न आयसीआयचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 915 कोटी रुपयांना हा व्यवहार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिग्रहणाचे कार्य 2021 च्या तिसऱया तिमाहीत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बेंगळूरच्या आयटी क्षेत्रातील इन्फोसिसने डिजिटल ग्राहक आणि वाणिज्य क्षेत्रात कार्यरत अमेरिकेतील ब्ल्यू अकॉर्न आयसीआय कंपनी ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. वाणिज्य सेवा क्षेत्रात ब्ल्यू अकॉर्नचा वाटा मोठा आहे.