नवी दिल्ली
आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 7 लाख कोटींवर पोहचलं आहे. सर्वाधिक भांडवल उभारणारी इन्फोसिस ही आता चौथी भारतीय कंपनी ठरली आहे. भारतीय भांडवली बाजारात सध्याला मोबाईल, रिटेलसह विविध उद्योगात कार्यरत असणाऱया रिलायन्स इंडस्ट्रिजने अग्रस्थान कायम ठेवले आहे. यापाठोपाठ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड आणि एचडीएफसी बँक लिमिटेड या कंपन्या अनुक्रमे दुसऱया, तिसऱया स्थानावर आहेत. या तिघांनीही 7 लाख कोटींचा आकडा यापूर्वीच पार केलेला आहे.