ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
इन्फोसिस या आयटी कंपनीने आपल्या 33 टक्के कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉर्म होम करण्याचा सल्ला दिला आहे.
इन्फोसिस ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी आहे. या कंपनीत 2 लाख 42 हजार 371 कर्मचारी काम करतात. त्यामधील 80 हजार कर्मचाऱ्यांना कंपनीने कायमस्वरूपी वर्क फ्रॉर्म होम करण्यास सांगितले आहे. कोरोना काळ संपल्यानंतर कंपनी पहिल्या सत्रात 50 टक्के कर्मचाऱ्यांचा कामावर बोलावेल. दुसऱ्या टप्प्यात 66 टक्के कर्मचारी कामावर हजर होतील. उर्वरित 33 टक्के कर्मचारी कायमस्वरूपी घरातूनच काम करणार आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
चौथ्या तिमाहीत इन्फोसिसचा नफा 6.3 टक्क्यांनी वाढला
चौथ्या तिमाहीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत इन्फोसिसचे सीओओ प्रवीण राव यांनी सांगितले होते की, घरून काम करण्याने कर्मचाऱ्यांच्या कामावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉर्म होम करण्यास सांगण्यात येत आहे. मार्च तिमाहीत इन्फोसिसचा एकूण निव्वळ नफा 4335 कोटी रुपयांचा होता. तो आता 6.3 टक्के अधिक आहे.